मुलींच्या लग्नाचे वय वाढवणे किती योग्य आहे, जगभरातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये लग्नाच्या वयाबदद्ल आपल्याला वेगवेगळे कायदे बघायला मिळतात. कायद्याने मान्यता नसली तरी सुध्दा बालविवाहांच्या अनेक केसेस आजही आपल्या समोर येतात. अनेक ठिकाणी तर बालविवाहाला कायदेशीर मान्यता देखील आहे.
सध्या देशात मुलाच्या लग्नाचे वय २१ वर्ष तर मुलीच्या लग्नाचे वय १८ वर्ष आहे. पण हे वय आता एकसमान करण्याबाबत तयारी सुरु असल्याचे दिसुन येते. यातही गावखेड्यात आणि शहरांमध्ये अगदीच भिन्न मतप्रणाली असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते. आजच्या काळात मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात काम करताना दिसतात, तर मग लग्नाच्या वयाबाबत सुध्दा एकसमानता असावी अशा स्वरुपाचा एक मतप्रवाह सुध्दा आपल्याला पाहायला मिळतो. मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी १८ वर्षांची अट असताना लग्नासाठीच २१ वर्ष का असे सवाल देखील उपस्थित होताना दिसतात.
हे झाले आपल्या देशातील लग्नासंबंधीच्या कायद्यांचे..आता जरा जगभरातील इतर देशांबद्दलही जाणून घेवूयात..
या ६ देशांमध्ये लग्नाच्या वयाबद्दल कोणताही कायदा नाही-
१९८ देशांना घेवून प्यू रिसर्चने तयार केलेल्या रिपोर्टमध्ये असे नमुद करण्यात आले आहे कि १९२ देशांमध्ये लग्नाच्या वयासंबंधी कायदे आहेत. तर १९८ पैकी इक्वेटोरियल गीनिया, गाम्बिया, सऊदी अरब, सोमालिया, साउथ सूडान और यमन हे ६ देश असे आहेत कि ज्यामध्ये लग्नाच्या वयाबद्दल कोणताही कायदा नाही. यातही विचार करण्याची गोष्ट म्हणजे काही देशांत कायद्यात सुट दिल्याचे आपल्याला पाहायला मिळते, आणि १४ वर्ष वयात सुध्दा लग्न करण्याची कायदेशीर परवानगी असल्याचे दिसुन येते. या पध्दतीची सुट एकट्या दुकट्या देशात नाही तर तब्बल ११७ देशांमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरुपात उपलब्ध आहे.
हि दुनिया रंगीबेरंगी, कायदे सुध्दा विविधतेने भरलेले-
सगळ्यात मजेशीर गोष्ट हि आहे कि जगात जवळपास ३८ असे देश आहेत जिथे मुले आणि मुलींच्या लग्नाचे वय वेगवेगळे आहे. जसे कि बांगलादेशात मुलींच्या लग्नाचे वय १८ तर मुलाचे २१ वर्ष आहे. सुडान या देशात मुलीचे लग्न १० आणि मुलाचे १५ व्या वर्षी लग्नाला मंजूरी देण्यात आली आहे. जर ते शारिरीकदृष्ट्या परिपक्व असतील तर, फिलिपींसमध्ये १५ वर्ष असताना लग्नाला मंजूरी आहे. टांजानियात मुस्लिम आणि हिंदू मुला मुलींना १२ वय वर्ष असताना लग्नाची मंजूरी आहे पण ते वय वर्ष १५ होईपर्यंत सोबत राहू शकत नाहीत.
Reviewer:Your Name Here –
March 29, 2012
