तुम्हीही समजून घ्या, कोणत्या कारणांमुळे अर्धांगवायू होतो? हे आपल्याला आधीच समजू शकतं का..

0

 



जर अर्धांगवायू हात आणि पायांना होत असेल तर तुम्हाला चालायला आणि लिहायला त्रास होईल.


तुम्ही बऱ्याचदा तुमच्या आसपास ऐकले असेल की कोणालातरी अर्धांगवायू झाला आहे. कदाचित तुमच्या कुटुंबातील कोणासोबत असे झाले असावे. अर्धांगवायू हा एक असा आजार आहे जो होण्याआधी काही समजत नाही आणि अचानक समस्या निर्माण होते. अशात लोकांच्या मनात अर्धांगवायूबद्दल अनेक प्रश्न निर्माण होतात. जसे की याची लक्षणे काय आहेत, हा कशामुळे होतो आणि हे होण्याआधी याची माहिती करून घेता येते की नाही.


तर मग जाणून घेवूयात अर्धांगवायूशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी, ज्यांच्याद्वारे तुम्ही जागरूक राहू शकता, याशिवाय येणारी समस्या टाळू देखील शकता. तर मग जाणून घेवूया याच्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट..


काय असतो अर्धांगवायू?


अचानक मेंदूच्या कोणत्यातरी भागात दुखापत असेल म्हणजेच रक्तपुरवठा कमी प्रमाणात होत असण्याची शक्यता असते. याच कारणामुळे अर्धांगवायू होत असतो. यामुळे होते असे की शरीराच्या एका बाजूच्या भागात जसे की एक हात किंवा एका पायात जास्त अशक्तपणा येतो.


कोणत्या कारणामुळे अर्धांगवायू होतो?


अर्धांगवायू होण्याची साधारणपणे दोन कारणे मानली जातात. यातील एक महत्वाचे म्हणजे ब्रेन हैम्ब्रेज असणे, म्हणजे मेंदूत जाणारी रक्तवाहिनी फुटणे. दुसरे कारण म्हणजे या रक्तवाहिनीमध्ये कोणत्यातरी कारणाने ब्लॉक तयार होणे. जास्तकरून केस ब्लोकेज संदर्भातील असल्याचे पाहायला मिळते. याच कारणामुळे अधिकतर लोकांना अर्धांगवायू होतो. एका रिपोर्टनुसार जवळपास ८५ टक्के लोकांना ब्लोकेजमुळे अर्धांगवायू झाल्याच्या केसेस आढळतात, तर उर्वरीत १५ टक्के केसेस बाकीच्या कारणांमुळे होत असतात.


जर रिस्क फॅक्टर बद्दल बोलायचे झाले तर डायबिटीज, ब्लड प्रेशर, लिपिड प्रोफाइल वाढलेली असेल तर याचा धोका सुध्दा अधिक जास्त असू शकतो. याशिवाय ज्या लोकांना हृदययासंबंधी काही आजार असतील आणि रक्ताच्या गाठी होण्याची समस्या असेल तर अनेकदा या गाठी हळूहळू मेंदूपर्यंत पोहोचून तेथे जमू लागतात. हेच पुढे जावून अर्धांगवायूचे कारण बनते. अशातच या आजारांना अर्धांगवायूचा रिस्क फॅक्टर मानले जाते.


अर्धांगवायूचे काही संकेत असतात?


बऱ्याचदा अनेकांना हा प्रश्न पडलेला असतो की अर्धांगवायूचे काही संकेत असतात का, ज्यांच्यावरून आपल्याला हे समजून घेता येईल की कोणाला पुढे जावून अर्धांगवायूची समस्या भेडसावणार आहे. म्हणजे आधीच सावध राहून त्या समस्येचा सामना करता येईल. याबाबत डॉक्टर्स असे सांगतात की, बऱ्याच कमी केसमध्ये आपल्याला याचे पूर्वानुमान लावता येते, कारण अगदी काही मिनिटांमध्ये हा होत असतो आणि त्यामुळे यापासून वाचण्यासाठी आधीपासून वेळ मिळत नाही.


पण ज्या केसेसमध्ये आधी या गोष्टींची माहिती मिळते, त्याच्या लक्षणांबद्दल बोलायचे झाले तर यात आधी अगदी सौम्य स्वरूपाचा अर्धांगवायू होतो. हा अर्धांगवायूसारखाच असतो, मात्र काही मिनिटांतच हा ठीक होतो. जसे की काही वेळ बोलायला त्रास होतो आणि काही वेळ शरीराच्या एका बाजूच्या भागात आपल्याला अशक्तपणा येतो. या केसेसना डॉक्टर्स टीआईए या नावाने ओळखतात. त्यामुळे हे अर्धांगवायूचे संकेत मानले जातात.


काय असतात अर्धांगवायूची लक्षणे?


जर अर्धांगवायूच्या लक्षणांबद्दल बोलायचे असेल तर अर्धांगवायू हात, पाय यांमध्ये झाला तर तुम्हाला चालायला आणि लिहायला समस्या होईल आणि अशक्तपणा येईल. तर ज्यांना चेहऱ्यावर अर्धांगवायू होतो त्यांना बोलायला आणि खायला त्रास होत असतो. याशिवाय अशक्तपणा आल्यामुळे आणखीन समस्या सुरू होवू लागतात, ज्यात बेड सोर्स इत्यादी वेगवेगळ्या समस्या असतात.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)
Pixy Newspaper 11
Pixy Newspaper 11
Pixy Newspaper 11
To Top